You are currently viewing वास्तू प्रदर्शनाने बांधकाम क्षेत्रास बुस्टर डोस मिळाला

वास्तू प्रदर्शनाने बांधकाम क्षेत्रास बुस्टर डोस मिळाला

चेंबर अध्यक्ष ललीत गांधी यांचे गौरवोद्गार

इचलकरंजी / प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच मोठ्या प्रमाणात वस्ञनगरीत आयकाॅन स्टील प्रायोजीत वास्तू २०२२ हे प्रदर्शन यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामुळे बांधकाम क्षेत्राला एक प्रकारे बुस्टर डोस मिळाला आहे. विविध सहा संघटनांनी अल्पावधीत हे प्रदर्शन आयोजित करुन एक आदर्श निर्माण केला आहे. आता शहरातील औद्योगिक, व्यापारी संघटनांची एक व्यापक बैठक घ्यावी. त्यांच्यासाठी चेंबर ऑफ काॅमर्सचे एक फॅसिलीटी सेंटर इचलकरंजीत सुरु करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

येथील केएटीपी ग्राऊंडवर क्रेडाई- इचलकरंजी, बिल्डर्स असोसिएशन – इचलकरंजी, इंजिनिअर्स ॲन्ड आर्किटेक्ट असोसिएशन, सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग काॅन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वास्तू २०२२ हे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. अभूतपूर्व प्रतिसादात या प्रदर्शनाचा सोमवारी सांयकाळी समारोप झाला. यावेळी श्री.गांधी बोलत होते. यावेळी इचलकरंजी माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्राॅमध्ये इलेक्ट्रीक बाईकचे बक्षीस सेंट्रींग काॅन्ट्रॅक्टर पुंडलीक कारंडे या भाग्यवान विजेत्यास लागले. तर टीव्ही संचचे बक्षिस फरशी फिटींग काॅन्ट्रॅक्टर शंकर कांबळे यांना लागले. यासह विविध बक्षिसाचे मानकरी ठरलेल्या सर्वांना समारोप कार्यक्रमात या वस्तूंचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक वास्तू कमिटी चेअरमन नितीन धूत यांनी केले. प्रदर्शन दरम्यान, माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर ,प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे राहूल खंजीरे, माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके, भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्याहस्ते लकी ड्राॅ काढण्यात आले. प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून प्रदर्शनाची शोभा वाढवली. यामध्ये खासदार धैर्यशील माने, पोलीस उप अधिक्षक बी.बी. महामुनी, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भेट दिली. सुत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले. आभार मयूर शहा यांनी मानले.दरम्यान ,प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी
विवेक सावंत, संजय रुग्गे, मयूर शहा, अनिल मनवाणी, संदीप जाधव, बळिराम घायतिडक, रमेश मर्दा, विकास चंगेडिया, फैयाज गैबान, सुधाकर झोले, तानाजी हराळे, शितल काजवे, मोहित गांधी, प्रितिश शहा, घनशाम सावलानी, महांतेश कोकळकी, सुहास अकिवाटे, सय्यद गफारी, अभय पिसे, सचिन बोरा, मुकुंद ओझा, नंदकुमार शहा, विठ्ठल तोडकर, राजू पाटील, राजेंद्र खंडेराजुरी, गजानन ढवळे, महेश महाजन, जहीर सौदागर, पन्नालाल डाळ्या, कुमार माळी, नारायण हुंद्रे, अक्षय सातपूते, राहूल निकम, सुधील लाटकर, भगवान कांबळे, शिवाजी पवार आदींनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा