भारतीय साहित्य व संस्कृती मंचर कोल्हापूर त्या सदस्य चंदा कौसडीकर यांची अप्रतिम काव्यरचना
आले सुगीचे दिवस
बहरले गच्च रान
कणसे भरले दाणे
गातो राघु प्रित गाणे
पहाटीला लागलीग
लाल गुलाब जाई
आणि जुई फुले
लावणय तिचे पाहुन
जिव प्रत्येक चा भुले
आला हरभरा शेतात
शालु हिरवा नेसली
स्पश वाऱ्याचा वेग
खट्याळ कशी गालात
हसली वसुंधरा राणी
पहा कशी नाचते नाचते
आला पौष महिना ग
सखी लाजते लाजते
सौ चंदा मुकुंद कौसडीकर