*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वासुदेव राव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना*
*बालपण*
एकच तीळ सात जण
आम्ही खात होतो वाटून
बालपणीच्या आठवणीत
आता गळा येतो दाटून !!
जात,धर्म,राव,रंक
राहो सारेच मिळून
संगमंग खेळत होतो
मना राग लोभ गिळून !!
एक ताटात जेवत होतो
कधी जात नव्हतो बाटून
बालपणीच्या आठवणीत
आता गळा येतो दाटून !!
भीमा रामा ज्याकी शेख
होतो आम्ही सारे एक
दिवाईच फराय अन
खावो नाताळचा केक !!
आम्ही ईदचा खीर खुरमा
सारे पेत होतो लुटून
बालपणीच्या आठवणीत
आता गळा येतो दाटून !!
हिंदू,मुस्लिम,शीख, ईसाई
होतो सारेच भाई भाई
सर्वधर्मसमभाव हा
होता रे सर्वांचेच ठाई !!
आता धर्म दंगल पाहून
माहय हृदय जाते फाटून
बालपणीच्या आठवणीत
आता गळा येतो दाटून !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(से नि)
अकोला 9923488556