You are currently viewing सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर

सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर

सिंधुदुर्गनगरी

 राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर कार्यक्रम व अमृत महोत्सव वर्षे तसेच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून समाज कल्याण विभागाने काल स्टॉल उभारुन या स्टॉलवरुन योजनांची माहिती देण्यात येत होती.

            योजनांची माहिती व प्रसारासाठी विभागाने युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती.प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात विभागाच्या योजनांची माहिती पुस्तके, माहिती पत्रिका पोहोच करण्यात आली होती. समाज कल्याण विभागाकडून विविध योजनांची माहिती दिली जात होती. महाराष्ट्र दिनी राज्यात एकाच दिवशी बहुतांश ठिकाणी एकाच वेळी झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो लोकांपर्यंत योजनांची माहिती उपलब्ध झाली आहे.सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारा स्टॉल पोलीस परेड ग्राऊड जवळ उभा करण्यात आला होता. या विभागाच्या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश आहे.

             समाज कल्याण विभागाचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासह सह विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांच्या बरोबरच बार्टीचे अधिकारी-कर्मचारी,तालुका समन्वयक, समता दूत , स्वयंसहायता युवा गटाचे प्रतिनिधी हे गावागावात पोहोचले होते त्यांनी योजनांची माहिती जनतेला करून दिली.अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळालेला  कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्यासह राज्यातील त्या-त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी यांचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा