कणकवली
जिल्ह्यातील विकास संस्थानी आता आपली पारंपरिक असलेले व्यवसाय सोडून संस्थेला अधिक उत्पन्न देणारे वेगळे व्यवसाय स्वीकारले पाहिजेत. खारेपाटण सोसायटीने त्याची सुरवात देखील केलेली आहे.त्यामुळे जिल्हा बँकेच्या वतीने येणाऱ्या काळात खारेपाटण सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपदन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १ मे महाराष्ट्र दिन वार्षिक पूजा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री समीर सावंत,खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार,व्हाईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर,इस्माईल मुकादम,संचालक विजय देसाई,एकनाथ कोकाटे,बलराम बाणे, मोहन पगारे,भाऊ राणे,संतोष सरफरे,सौ उज्वला चिके,रवींद्र शेट्ये,संस्थेचे सचिव कृष्णा कर्ले,प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री संतोष पाटणकर,पतसंस्थेचे मुख्य कार्य. अधिकरी शुभम मोरे,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खारेपाटण सोसायटीच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि संचालक समीर सावंत यांचा सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र जठार यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर सोसायटीचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री बाळकृष्ण शंकर शिंदे यांचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण सोसायटीचे सभासद व शिडवणे गावचे रहिवासी शिवदास श्रीधर कुडतरकर यांना सोसायटीच्या माध्यमातून शेती करिता आवश्यक असलेला “पावर विडर ” च्या चावी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्री समीर सावंत,रवींद्र जठार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. खारेपाटण सोसायटीच्या वतीने दरवर्षी संस्थेच्या कार्यलयात १ मे महाराष्ट्र दिनी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमाला सर्व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एकनाथ कोकाटे तर आभार विजय देसाई यानी मानले.