You are currently viewing देशात कोरोना मृतांची संख्या १ लाखांवर

देशात कोरोना मृतांची संख्या १ लाखांवर

नवी दिल्ली :

 

गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. परंतु आता पुन्हा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८१ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे यातून ब-या होणा-या रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत ५३ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गेल्या २४ तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच १ हजार ०९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले.

राज्यात मृतांचा आकडा ३७ हजारांवर

राज्यात आज ४२४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ३७ हजार ४८० इतका झाला आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५ हजार ५९१ नवीन रुग्ण आढळले असून आज १३ हजार २९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के एवढे झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा