You are currently viewing सिद्ध कर तू

सिद्ध कर तू

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरच्या सदस्या संगीता नागदिवे यांची अप्रतिम काव्यरचना

एकदा तरी तू
स्वतःसाठी जग
स्वच्छंद मनासाठी
होऊन बघ खग !!!

रात्रंदिवस कष्ट करून
कुटुंबाचा सांभाळला डोलारा
मुलाबाळांसाठी जगणं
स्व साठी फुलव पिसारा !!!

संसारात तुझं अस्तित्व
प्रकर्षाने जाणवते
गुणवत्ता असूनही
कुटुंबामुळेच कोमेजते !!!

प्रगती तू कर आता
बुद्धिमत्तेची आहेस खान
आत्मसन्मानाने
मिळव तू मान !!!

खचू नको आता
जिद्दीने चढ वर
स्वतंत्र होऊन
कर्तुत्व सिद्ध कर !!!

संगीता नागदिवे
यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा