सावंतवाडी
ओवळीये ग्रामपंचायत च्या सौजन्याने १४ वित्त आयोग निधी मधून युवा परिवर्तन यांच्या माध्यमातून गावातील महिलाना स्वयंरोजगार च्या उद्धेशाने मसाले , लोणचं आणि पापडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. गावातील महिलांनी स्वतः उत्पादन करून मार्केट मध्ये जर माल विक्री केली. तर त्याचा आर्थिक विकास होईल. या उद्धेशाने ग्रामपंचायत मार्फत एक संधी सर्व गावातील महिलांना दिली आहे. या कार्यक्रमाला गावचे सरपंच तसेच सर्व बचत गट सर्व प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी सरपंच विनायक सावंत, उपसरपंच सागर सावंत , ग्रा. प. सदस्य मनोज सावंत, राजेश सावंत, संजना सावंत, तारामती नाईक, जयश्री सावंत, स्वेता सावंत, ग्रामसेवक आनंद परब ग्राम. संघ अध्यक्ष प्रेरणा सावंत, डाटा ऑपरेट गावडे, सौ. मडगावकर बचत गट CRP शकुंतला राऊळ, शिपाई रोशन सावंत मोठया संख्येने महिला मंडळ उपस्थित होते.