You are currently viewing नवोदयच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सावंतवाडी शिवसेनेने रोखले…

नवोदयच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सावंतवाडी शिवसेनेने रोखले…

नवोदयच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सावंतवाडी शिवसेनेने रोखले…

पदाधिकारी आक्रमक; पोलिसांकडुन परिक्षा केंद्राबाहेर कडे, आक्रमक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात…

सावंतवाडी

परजिल्ह्यातून नवोदयच्या परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आज येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांची हॉल तिकीटे आणि आधारकार्ड वेगवेगळी असल्यामुळे पोलिसांशी जोरदार शाब्दिक युध्द रंगले. यावेळी स्थानिक मुलांवर अन्याय नको आमचा या मुलांना विरोध नाही, परंतू प्रक्रियेला विरोध आहे, असे सांगून तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या रेटून धरल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे लक्षात येताच पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी सर्वांना स्थानबध्द करीत केले. काही झाले तरी आम्ही कायदा हातात घेवू देणार नाही, मुलांचे भवितव्य खराब होवू देणार नाही, असे पोलिस निरिक्षक कोरे यांनी सांगितले. शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, युवा सेनेचे सागर नाणोसकर, गुणाजी गावडे, नगरसेवक शुभांगी सुकी, भारती मोरे, अनारोजीन लोबो, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणीयार, प्रशांत कोठावळे, महेंद्र सावंत, विनायक सावंत, योगेश नाईक, विशाल सावंत, प्रतिक बांदेकर, विशाल बांदेकर, संजय माजगावकर, विनोद ठाकुर, वासुदेव जोशी, एकनाथ नाराजी, संदेश गुरव, गुंजन हीराप, राजू मुळीक, शिवदत्त घोगळे आदी उपस्थित होते.

यावेळी सकाळी साडे आठ वाजल्यापासून राणी पार्वती देवी हायस्कुलच्या परिक्षा केंद्राबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्या ठिकाणी येणार्‍या विद्यार्थ्यांना काही झाले तरी आत प्रवेश करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पोलिसांनी परिक्षा केंद्राच्या बाहेर कडे करत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आम्ही न्याय मार्गाने आंदोलन करीत आहोत. कायदा हातात घेतलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आमच्यावर दबाव आणू नये, असा इशारा तालुकाप्रमुख राऊळ यांनी दिला. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना आंदोलकांकडुन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांची हॉल तिकीट आणि आधारकार्ड तपासण्यात आली यावेळी अनेक आधारकार्ड ही जिल्ह्याबाहेरील असल्यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले आणि आम्ही आता जिल्ह्याबाहेरील मुलांना जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्याला पोलिस निरिक्षक कोरे यांनी विरोध करीत सर्वांना ताब्यात घ्या, अशा आपल्या कर्मचार्‍यांना सुचना केल्या. त्यानंतर सर्व पदाधिकार्‍यांना स्थानबध्द करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा