You are currently viewing आंबोली घाटातील मृत महिलेचा मृत्यू कार मध्येच?

आंबोली घाटातील मृत महिलेचा मृत्यू कार मध्येच?

कार मालकाचे नाव का लपविले जाते?

आंबोली घाटातील मृत महिलेचा मृत्यू हा पोष्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर संशयास्पद होऊन राहिलेला आहे. संशयित आरोपींच्या म्हणण्यानुसार मृत्यू कोलगाव येथील जंगलात शरीरसंबंध करत असताना गळ्यावर हात दाबला गेल्याने गाडीतच झाला होता. चारही आरोपींनी सदर महिलेला हालवून पाहिल्यानंतरही ती हालत नव्हती, त्यामुळे मुख्य संशयित आडणेकर याच्या धमकविण्यामुळे तिला आंबोली घाटातील दरीत फेकून दिले होते. परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मृत्यू १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबरच्या दरम्यान झालेला आहे. म्हणजे ३१ तारीखला मृत झाली म्हणून त्या महिलेस घाटातील दरीत फेकून दिले तेव्हा ती जिवंत होती आणि तदनंतर मयत झाली का?
आरोपींनी मृत महिला गीतांजली मळगावकर असल्याचे सांगितले तरी तिचा डीएनए रिपोर्ट तिच्या मुलाच्या डीएनएशी मॅच करण्यासाठी तिच्या मुलाला पोलिसस्टेशन पाचारण करण्यात आले आहे. मृत महिला ही तीच असल्याची खात्री होणे पोलिसांना महत्वाचे वाटत आहे. वापरण्यात आलेली कार कोणाची याबाबतही पोलिसांनी खुलासा केलेली नाही. कार मालकाची चौकशी केली असता सदर कारचा मूळ मालक दुसराच असून ती तिसऱ्या व्यक्तीला विकली असल्याचे समोर येत आहे. परंतु गाडी मूळ मालकाच्याच नावावर असल्याने त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यात वापरलेली कार संशयित आरोपीकडे कशी आली? या गुन्ह्यात अजून कोण सहभागी होते का? असे प्रश्न उपस्थित होत असताना गुन्ह्यात आणखी लोक सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चौकशीतून आणखी कोणती नावे पूढे येतात? नक्की गुन्हा कोणी केला, कशासाठी केला? हे सुद्धा त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मृत महिलेच्या कॉल डिटेल्स मध्ये आणखी कोणाची नावे आहेत, आरोपींशी मध्यंतरीच्या दिवसात कोणाकोणाचा संपर्क झाला होता? यावरून गुन्ह्याचा उलगडा होत जाणार आहे.
गोवा बनावटीच्या अवैद्य दारू धंद्यातून मिळालेल्या बेहिशोबी पैशांमुळे आणि त्यामुळे लागलेल्या व्यसनांच्या आहारी जात मिसरूड फुटण्या अगोदर वासनांध होत अशी तरुण मुले गंभीर गुन्हे करत आहेत. त्यामुळे दारू, मटका अशा अवैद्य धंदेवाल्यांवर आणि त्यांच्याशी निगडित असणारे पायलट, गाडी ड्रायव्हर्स, आणि त्यांचे इतर सहकारी यांना उचलून त्यांची पोलीस स्टेशनमध्ये परेड होणे आवश्यक आहे. दारू वाहतुकीशी निगडित असणाऱ्या तरुण पोरांना पॉकेसांची भीती उरलेलीच नाही ती खाकितील काही जणांच्या दारू व्यवसायाशी निगडित लोकांशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळेच. काही खाकिवाल्यांना दारू व्यवसायिकांकडून मिळणारे हफ्ते खाकीच्या तपासावर परिणाम करतात आणि त्यातूनच आरोपी सहीसलामत सुटतात आणि पुन्हा उजळ माथ्याने गुन्हे करण्यास मोकळे होतात.
दारूचे अवैद्य धंदे आणि पोलिसांवर होणारे आरोप यामुळे आपली प्रतिमा राखायची असेल तर सदरच्या गुन्ह्यात दारू व्यवसायातील संबंधित आणखी कोण व्यक्ती सहभागी तर नाही ना? याबद्दल पोलिसांना कसून चौकशी करावी लागणार आहे त्याचबरोबर सावंतवाडीत वाढलेले अवैध दारूचे धंदे सुद्धा पोलिसांना मुळासहित उखडून टाकण्याचे प्रयत्न करावे लागतील. तसेच मृत महिलेचा मृत्यू गाडीतच झाला होता की बेशुद्धावस्थेत दरीत टाकल्यानंतर झाला याबाबत सुद्धा सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे लागेल.
*क्रमशः*

प्रतिक्रिया व्यक्त करा