You are currently viewing ओवळीये ग्रामपंचायतीतर्फे महिलांना स्वंयरोजगार प्रशिक्षण

ओवळीये ग्रामपंचायतीतर्फे महिलांना स्वंयरोजगार प्रशिक्षण

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये ग्रामपंचायतच्या सौजन्याने 14 वित्त आयोग निधी मधून युवा परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून गावातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मसाले, लोणचं आणि पापड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

गावातील महिलांनी स्वतः उत्पादने तयार करून स्थानिक बाजारपेठेत विक्री केली तर त्यांचा आर्थिक विकास होईल. या उद्देशाने ओवळीये ग्रामपंचायत तर्फे एक संधी सर्व गावातील महिलांना दिली आहे.

यावेेळी सरपंच विनायक सावंत, उपसरपंच सागर सावंत, ग्रा. प. सदस्य मनोज सावंत, राजेश सावंत, संजना सावंत, तारामती नाईक, जयश्री सावंत, श्वेता सावंत, ग्रामसेवक आनंद परब, ग्राम. संघ अध्यक्ष प्रेरणा सावंत, बचत गट सीआरपी शकुंतला राऊळ, डाटा ऑपरेटर चारुशिला गावडे, शिपाई रोशन सावंत, तसेच मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा