दोडामार्ग
गेल्या तीन वर्षांपासून कोनाळ व आजुबाजूच्या गावांना पूराचा तडाखा बसत आहे. येणाऱ्या पुरा मुळे गावातील ग्रामस्थांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागामार्फत ग्रामपंचायतीला गावातील नदीकिनारी अतिवृष्टीमुळे व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचा क्षेत्रीय अहवाल तात्काळ सादर करण्यासाठी सांगितले होते.त्याप्रमाणे संरक्षक भिंत बांधणे तसेच गाळ काढणे गरजेचे आहे अशा प्रकारचा अहवाल कोनाळ ग्रामपंचायतीमार्फत २०२१ ला सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाला सादर केला होता.परंतु अद्याप पर्यंत सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने यावर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही.मागील दोन वर्षांपासून कोनाळ परिसरात सतत पूर परिस्थिती निर्माण होत आहे.यावर पाटबंधारे विभागाकडून कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नाही.वारंवार पाटबंधारे विभागाकडून या संवेदनशील विषयाला बगल देण्याचा काम होत आहे.तसेच पाटबंधारे विभागामार्फत जिथे खरोखर कामाची गरज आहे तिथे कमी आणि जीथे कामाची गरज नाही अशा ठिकाणी कामे केली जात आहेत. त्यामुळे आपल्या या विभागाच्या पूरग्रस्त व शेतकरी विरोधी धोरणा विरोधात महाराष्ट्र दिनी तिलारी पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा निर्णय कोनाळ सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ व पूर बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे.असे पत्र कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यकारी अभियंता सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चराठा सावंतवाडी यांना दिले आहे.
उपोषणाचे मुद्दे खालील प्रमाणे..
१ ) पुच्छ कालव्याच्या डावीकडून ते अनिल मणेरीकर यांच्या जमिनीलगत नदीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधणे तसेच तेथील गाळ काढणे.
२) रत्नकांत कर्पे यांच्या घराच्या मागील बाजूला संरक्षक भिंत बांधणे व गाळ काढणे.
३) कोनाळ ठाकरवाडी येथील येळपई नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधणे व नाल्यातील गाळ काढणे.
४) कोनाळ नळपाणी योजना विहीर ते मागासवर्गीय स्मशानभूमी पर्यंत संरक्षक भिंत बांधणे.
५ ) महालक्ष्मी विद्युत मधून पावसाळ्यात नाल्यातून सोडण्यात येणारे पाणी पावसाळ्यात सोडण्यात येवू नये. मागील पावसाळ्यात महालक्ष्मी कंपनीकडून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या पाईप लाईन साठी कायम स्वरूपी उपाय योजना करणे.
६ ) पाटबंधारे विभागामार्फत तिलारी भागात चालू असलेली कामे निकृष्ट अत्यंत कमी दर्जाची करण्यात येत आहे.तसेच मोठ्या प्रमाणात त्यात घोळ असून चालू असलेल्या कामाची चौकशी वरिष्ठ पातळीवर करण्यात यावी.
७ ) कोनाळ , खानयाळे, वायंगणतड, कालवा दुरुस्ती करणे.
वरील सर्व मुद्द्यांचे निराकरण होईपर्यंत पाटबंधारे विभागाच्या विरोधात १ मे रोजी उपोषण करण्यात येईल तरी वरील मुद्द्यांवर पाटबंधारे विभागामार्फत काय कारवाई करण्यात आली आहे याबाबत ही माहिती द्यावी अशा प्रकारचे पत्र कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी कार्यकारी अभियंता, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराठा सावंतवाडी यांना दिले आहे.