भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरच्या सदस्य लेखिका कवयित्री सौ.संगीता नागदिवे यांची अप्रतिम काव्यरचना
आयुष्याच्या लघुपटावर
जिंकलीस तू ग नारी
शिकूनी सुशिक्षित झालीस
दिसे नवरूप तुझे घरोघरी…
संसाराची बाग फुलवूनी
घेता जबाबदारी खांद्यावरी
प्रशासकीय सेवेचे ओझे
प्रत्येक क्षेत्रातही भूषविणारी…
धैर्याने मेहनतीने जगी
अशी उंच भरारी घेवूनी
अंतराळात तु चमकली
कर्तृत्वाची झालर लावूनी…
मनी कधीं न डगमगता
आव्हानेही खूप स्वीकारली
मासाहेब जिजाऊचे संस्कार
मात्र तू कधी नाही विसरली…
सैनिक निर्माण करुनी
देश सेवेसाठी वाहिली
धन्य आहे तू नारी
कीर्ती चोहीकडे पसरली…
राष्ट्रपती पंतप्रधान बनुनी
देशाची प्रतिमा उंचावली
कर्तृत्वाची मशाल घेऊनी
जगात रणरागिणी बनली..
दैदिप्यमान यश तुझे
सावित्रीच्या अस्तित्वाने
पंखात बळ असे भरलेले
संघर्षातील तुझ्या त्यागाने…
*सौ संगीता नागदिवे..* ✍
*यवतमाळ