You are currently viewing फुलपाखरांनो

फुलपाखरांनो

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना

इंद्रधनुचा सप्तरंग घ्यारे
फुलपाखरांनो यारे यारे

मोगरा फुलला,जाई हसली
रंग चमेली लाजुनी बसली
जुई छकुली बोलता फसली
सदाफुली रंग,गंध देती सारे

चाफा हलता,मारतो चापटी
गुलाब हाती मारील छिपटी
राघूमैना शालू देतील पोपटी
सारे मित्र हाक तुज ते मारे

गाणी बोले रिमझिम श्रावणी
झुला झुलतो शिवार छावणी
चिखल मातीत भात लावणी
झुला झुलवी तुज निर्मळ वारे

खळखळ करीत भरली डबकी
उनाड वारा हळूच मारी डुबकी
तू , फुलपाखरा शोभे साहेबकी
सर्वात आवडे तुझे रुप साजिरे

बोलून बोलून थकली केतकी
गंध मकरंदानी भरले शेतकी
तुज आळवण्या करी नर्तकी
घननिळ बरसे हळुवार निरे

छिपटी : छडी

© मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा