अवैद्य धंदे पंधरा दिवसात बंद करा; अन्यथा मनसे कार्यकर्ते उधळून लावतील…
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले जुगार, पट, गोवा बनावटीची दारू वाहतूक आदी प्रकार येत्या पंधरा दिवसात बंद करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न व्हावेत, अन्यथा मनसे कायदा हातात घेईल, असा इशारा मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोकण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना दिला आहे. दरम्यान आपण वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याकडे स्थानिक पोलिस अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अधिकृत परमिट रूम चालवणाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे, असेही श्री.उपरकर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तर हे धंदे येत्या पंधरा दिवसात बंद करण्यात यावेत, अन्यथा मनसेची पदाधिकारी संबंधित अवैद्य धंदे वाहतूक उधळून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.