You are currently viewing डेगवे-आंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणीस्थळात श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन

डेगवे-आंबेखणवाडीतील श्री ब्राह्मणीस्थळात श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन

पुणे येथील हरीहर नातू बुवा यांचे किर्तन

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात अक्षय तृतीया दिवशी अर्थात मंगळवार दि.3 मे २०२२ रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली आहे.
डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे
अलीकडेच सदर.परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून पुर्ण केले आहे.त्यामुळे अक्षय तृतीया या दिवशीचे महत्त्व जाणून श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे सकाळी 10.00 वाजता आयोजन केले आहे.
तरी भाविकांनी तिर्थ प्रसादाचा व दुपारी महाप्रसादाचा,व रात्री ,8.00 पुणे येथील ख्यातनाम किर्तनकार हरीहर नातू बुवा यांचे धार्मिक कार्यक्रमावर आधारित किर्तन होणार आहे.त्यांना हार्मोनियमची साथ स्वप्नील गोरे व तबलावादक गणेश वेतोरकर यांची साथ आहे.शिवाय स्थानिक ग्रामस्थाचा भजनाचा,कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आवाहन डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा राज्यस्तरीय ग्रंथमित्र श्री उल्हास देसाई व डेगवे गावचे माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी संयुक्त पत्राद्वारे केले आहे. तरी या किर्तनाचा व कार्यक्रमास आम भाविक जनतेने लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे

उल्हास देसाई,
सरचिटणीस
,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा