उत्साहाचे वातावरण ; सेवेक-यांची अलोट गर्दी
इचलकरंजी येथील नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नाम-जप-यज्ञसप्ताहची सांगता आज गुरुवारी करण्यात आली. यावेळी उत्साही वातावरणात सेवेक-यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
इचलकरंजी शहरातील नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध धार्मिक सेवांबरोबरच सेवेक-यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते. याशिवाय संसार, नोकरी, उद्योग व व्यवसायातील समस्यांवर आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते. विशेष म्हणजे अध्यात्माबरोबरच समाजातील गरजूंना विविध माध्यमातून मदत, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर देखील विशेष भर दिला जातो. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गुरुवार दि.२१ एप्रिल रोजी ग्रामदेवता निमत्रंण, मंडल माडणी, अग्नीदीपन कार्यक्रम, शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी मंडल स्थापना, स्थापित देवता हवन, अग्निस्थापना, नित्यस्वाहाःकार, कार्यक्रम, शनिवार दि.२३ एप्रिल रोजी श्री गणेशयाग व मनोबोध याग कार्यक्रम , रविवार दि.२४ एप्रिल रोजी चंडीयाग कार्यक्रम, सोमवार दि.२५ एप्रिल रोजी श्री स्वामी याग कार्यक्रम, मंगळवार दि.२६ एप्रिल रोजी श्री गिताई याग कार्यक्रम, बुधवार दि.२७ रोजी एप्रिल रोजी श्री रुद्र याग, मल्हारी याग कार्यक्रम, गुरूवार दि.२८ एप्रिल रोजी बली पुर्णाहुती, सत्यदत्त पुजन होऊन सकाळी १०-३०वा. महाआरती करण्यात आली.
सप्ताह काळात सकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष याग,यज्ञ,आठ वाजता भुपाळी आरती यानतंर श्री गुरुचरित्र वाचन, सकाळी साडेदहा वाजता नैवेध आरती, अकरानंतर अब्ज चंडी सेवा, सांयकाळी साडेसहा वाजता नैवेध आरती यानंतर विष्णु सहस्त्रनाम, तसेच अखंड२४ तास महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी प्रहरेची सेवा रुजू केली. यावेळी उत्साही वातावरणात सेवेक-यांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती तसेच मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.