वेंगुर्ले
तालुक्यात शिरोडा व रेडी परिसरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. यात रेडी हुडा येथील नारायण सिताराम शेटकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडुन अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली.
गेले काही दिवसांपासून अचानक येत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. सोमवारी २५ एप्रिलला विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट करीत आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच दरम्यान परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा काल सकाळी पूर्ववत करण्यात आला.