सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघातर्फे सन्मान
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ न. म. विद्यालय व ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सहाय्यक शिक्षक दयानंद बंडू कोकाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो . खारेपाटण प्रशालेमध्ये ऑटो इंजिनिअरिंग व्यवसाय अभ्यासक्रमाचे सहाय्यक शिक्षक दयानंद बंडू कोकाटे हे मागील २४ वर्षे या प्रशालेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर ,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष बी. डी . पाटील ,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील ,कोकण विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष टी . के. पाटील ,माध्यमिक संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर ,महिला आघाडी प्रमुख अश्विनी गर्जे ,जिल्हा पदाधिकारी पांडुरंग काळे ,संदीप शिंदे ,अजय शिंदे तसेच शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी गजानन नानचे व इतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .