:-प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोले, संचालक मिशन आयएएस
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांचे वडील खासदार एकनाथराव गायकवाड यांचा पहिला स्मृतिदिन .लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या वडिलांना आदरांजली अर्पण करतात. सन्माननीय वर्षाताईंनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ खासदार एकनाथ गायकवाड फाऊंडेशन स्थापन करून व त्या मार्फत स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अभ्यासिका ग्रंथालय असा संकल्प जाहीर केलेला आहे. केवळ संकल्प जाहीर करून त्या थांबल्या नाहीत .तर गत वर्षीच त्यांनी या उपक्रमाचा शुभारंभ देखील केलेला आहे .या उपक्रमाची सुरुवात धारावीपासून झाली .धारावी तसा गाजलेला भाग .आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून उल्लेख असलेला. परंतु वर्षाताईंनी या धारावीला खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात जागे करायचे ठरवले आहे. मुलांना जर चांगले रोजगार मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्व तत्पर तेजस्वी व तपस्वी घडविले .तर ते चांगले अधिकारी होऊ शकतात .आणि देशाचा विकास करू शकतात. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व चांगले झाले आणि कदाचित तो जिल्हाधिकारी जरी झाला नाही तरी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस निरीक्षक अशा कुठल्या तरी पदावर जाऊ शकतो. त्याला जर प्रशिक्षण दिले तर हा मुलगा ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो .हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून सन्माननीय वर्षाताई गायकवाड यांनी एकनाथ गायकवाड फाउंडेशनची स्थापना केली .मागील वर्षी 17 व 18 डिसेंबरला त्यांनी धारावी येथील शाहूनगर मैदानावर प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला. दहावी बारावीतील मुलांचे सत्कार केले. त्यांना पारितोषिके दिली. अगदी पन्नास टक्के गुण मिळालेल्यांचाही त्यांनी गौरव केला .या कार्यक्रमाला त्यांनी मला माझा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केले. दहावी-बारावीनंतर मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे म्हणजे मुले वयाच्या 22 23 24 या वयोगटात अधिकारी होऊ शकतील. हा उद्देश डोळ्यासमोर होता .माझ्या या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. कार्यक्रमानंतर मी वर्षाताई व त्यांचे यजमान व त्यांचे संबंधित अधिकारी यांच्या वारंवार सभा झाल्या आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्राला जागे करण्यासाठी मिशन आयएएस राबविण्याचे ठरविले. कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र .त्याची सुरुवात धारावीपासून होत आहे. एकनाथ गायकवाड फाउंडेशन या संस्थेमार्फत धारावीला नवा आकार मिळत आहे .ग्रंथालय बांधायला सुरुवात झालेली आहे .त्याच ठिकाणी अभ्यासिका. मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन .वेळोवेळी वरिष्ठ सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. असा स्थूल मानाने आराखडा आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणे ही जबाबदारी माझ्यावर व लातूरच्या संस्कारचे संचालक श्री ओमप्रकाश जाधव यांच्यावर सोपवलेली आहे .त्या दृष्टिकोनातून आम्ही आराखडा तयार केलेला आहे. गेल्या चार महिन्यांपासून मी वर्षाताईंच्या व त्यांच्या यजमानांच्या तसेच त्यांच्या यासंदर्भातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे .करावे ते चांगलेच . मुलांना शालेय जीवनापासून जर स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्यात आले तर ते विद्यार्थी जीवनामध्ये समर्थपणे उभे राहू शकतात .हा आमचा विचार वर्षाताईंना आम्ही सांगितला .हा जूनियर आय ए एस कॉम्पिटिशन हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचे ठरविले जात आहे. हा उपक्रम जेव्हा आम्ही वर्षा ताईंना सांगितला .त्यांना तो पटला आणि त्यांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी राबवण्यासाठी पुढाकार घेतला .कदाचित या सत्रापासून हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे सुरू होईल .रविंद्रनाथ टागोरांची एक कविता आहे .गीतांजलीमध्ये आहे. नोबेल पारितोषिक मिळाले आहे .त्या कवितेमध्ये ते असे म्हणतात की मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला .माझे काम माझ्या नंतर कोन करेल. कोणीच उत्तर दिले नाही .एक मिणमिणती पणती म्हणाली .भगवान मी माझ्या परीने प्रयत्न करेन. सन्माननीय प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एकनाथ गायकवाड फाऊंडेशन स्थापन करून हि पणती पेटवलेली आहे .नुसतं पणती पेटवून त्या थांबलेल्या नाहीत.तर धारावीबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा हा उपक्रम प्रकाशमान होण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे .जितनेवाले कोई अलग काम नही करते वह हर काम अलग ढंगसे करते है .खरं म्हणजे बिहार उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या संख्येने कलेक्टर एस पी आयएएस आयपीएस होतात त्याचे कारण असे आहे की तिथे पाचव्या वर्गापासून स्पर्धा परीक्षेचे धडे दिले जातात.तिथले अभ्यासक्रम देखील स्पर्धापरीक्षेच्या अनुकुल बनवलेले आहेत .ही बाब वर्षाताईंना आम्ही सांगितली आणि त्यांनी यासंदर्भात ताबडतोब पाऊल उचलले .येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाला शालेय जीवनापासुन सुरु होण्याची शाक्यता आहे. हा प्रकल्प ऐच्छिक राहणार आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी अर्ज करायचा आणि या उपक्रमात सहभागी व्हायचे .साधी सरळ पद्धत. पण त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता .आता तो सन्माननीय वर्षाताई गायकवाड यांनी घेललेला आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकनाथ गायकवाड फाऊंडेशन स्थापन करून त्यामार्फत सर्वप्रथम धारावीला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुजलाम सुफलाम करणारा हा प्रकल्प निश्चितच धारावीतील विद्यार्थ्यांना युवकांना एका उंचीवर नेऊन पोचवेल यात शंका नाही .वर्षाताईसाहेबांनी याकामी पुढाकार घेतला आहे .तो निश्चितच अभिनंदनीय आहे. आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असा चांगला निर्णय घेणाऱ्या वर्षा ताईंना मनापासून धन्यवाद .’ असेच उपक्रम जर महाराष्ट्रातील इतरांनीही राबविले तर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत संपूर्ण भारत देशात पहिल्या क्रमांकावर आल्या शिवाय राहणार नाही .आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकनाथ फाउंडेशन स्थापन करून आणि त्यामार्फत स्पर्धा परीक्षेसाठी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्षा ताई साहेबांनी जे पाऊल उचलले आहे ते निश्चितच अभिमानास्पद आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे. संचालक. मिशन आयएएस. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी.. अमरावती कॅम्प 98 90 96 7003