जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी डॉक्टर बी. व्ही. कुलकर्णी (सिंगापूर) यांची अप्रतिम काव्यरचना
ते मन हेलकावले
अप्रूप निवले तेंव्हा
अबोल प्रारब्ध गेले
मिटून अकाली जेंव्हा,
थकल्या भागल्या देही
एकटा उरलो तेंव्हा
निःशब्द उबेत गेलो
सांजवेळ आली जेंव्हा,
मोडून पडलो होतो
पचवले दुःख तेंव्हा
सावरले तिने होते
भेटली नियती जेंव्हा,
साठवून काय करू
विचार नव्हता जेंव्हा
झोळी फाटकी राहिली
उमगून आले तेंव्हा,
वेचले अफाट क्षण
जाणवले गेले तेंव्हा
नव्हते कुणी सोबत
रिक्तता वाहिली जेंव्हा,
वाट्यास कितीही आले
हृदयात दु:ख तेंव्हा
सावरून जगलो मी
लाभली लाडकी जेंव्हा,
नव्हत्या अपेक्षा काही
जगण्यास वेळ तेंव्हा
भरून पावलो आम्ही
शेवटात आलो जेंव्हा,
रित्या मनी उगवले
शब्दांचे गुऱ्हाळ तेंव्हा
कविता जन्मली उरी
गुंतली भावना जेंव्हा,
पाहिले डोळ्यांत माझ्या
नाचला आनंद तेंव्हा
झुकलो बाहूत तिच्या
स्मरल्या आठव जेंव्हा,
बघून देखण्या तिला
वेडावलो मीच तेंव्हा
वेचले अनंत मोती
लाजून हसली जेंव्हा.☺️
© डॉ. बी. व्ही. कुलकर्णी,
१६ एप्रिल २०२२, सिंगापूर,
✒️ 9422010682.