You are currently viewing परजिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यांला नवोदय प्रवेश परीक्षेला वेंगुर्ले परीक्षाकेंद्रावर बसु देणार नाही

परजिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्यांला नवोदय प्रवेश परीक्षेला वेंगुर्ले परीक्षाकेंद्रावर बसु देणार नाही

भाजपा च्या वतीने स्थानिक पालकांना घेऊन जन आंदोलन

भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई 

🔸परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देणारया मुख्याध्यापकांवर कारवाई साठी शासनाचे लक्ष वेधनार .
🔸परजिल्ह्यातील मुलांना हाॅलतीकीट मिळण्यास शिक्षण विभाग जबाबदार .
🔸वेंगुर्ले तालुक्यातील दोन हायस्कूल मधील ३६ विद्यार्थी हे परजिल्ह्यातील परिक्षार्थी .

केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारया नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेला बसत असतात . मात्र असे असतानाही परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नंबर नवोदयसाठी लागतो व सिंधुदुर्गातील मुले वंचित रहातात .
गेल्या अनेक वर्षापासून हीच स्थिती आहे . या प्रकाराला शिक्षण विभागही जबाबदार आहे . कारण शिक्षण विभागातील परजिल्ह्यातील अधिकारी यांचे हितसंबंध असल्यामुळे तीकडील मुले फक्त परीक्षेसाठी आणुन , त्यांचा कागदोपत्री प्रवेश दाखवुन परीक्षेला बसवली जातात . ती मुले कोल्हापुरात असताना सुद्धा त्यांची याठिकाणी हजेरी दाखवली जाते , व शिक्षण विभाग त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते . त्यामुळे मुलांना परीक्षेसाठी हाॅलतीकीट मिळते .
गेल्या वर्षीही अशाच प्रकारे नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी घाटमाथ्यावरील विद्यार्थी बसले होते . त्यावेळी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आवाज उठवला होता व स्थानिक पालकांनी याबाबत आंदोलनाची भुमिका घेतली होती . त्यामुळे ह्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थी बसले नाहीत .
वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षण विभागाकडून माहिती घेतल्यावर असे निदर्शनास आले की , सन २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मधे परजिल्ह्यातील प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे *न्यु इंग्लिश स्कूल , मातोंड – २३ विद्यार्थी व शिवाजी हायस्कूल ,तुळस – १३ असे एकुण ३६ विद्यार्थी* हे थेट कोल्हापुरातुन ह्या दोन हायस्कूल मध्ये ५ वी मधे प्रवेशकर्ते झालेले आहेत .
फक्त पाचवीतच प्रवेश का ?
वेंगुर्ले तालुक्यामध्ये एकुण १४ हायस्कूल आहेत , परंतु सातत्याने तुळस व मातोंड हायस्कूल मध्येच थेट ५ वी मध्ये घाटमाथ्यावरील मुले प्रवेश घेतात यात गौडबंगाल आहे . याची उच्चस्तरीय चौकशी शिक्षण विभागाकडुन होणे आवश्यक आहे . कारण सदर विद्यार्थी हे पहीले ते चौथी पर्यंत चे शिक्षण आपल्या जिल्ह्यात घेतात व फक्त पाचवीत वेंगुर्ले तालुक्यातील तुळस व मातोंड हायस्कूल मध्येच प्रवेश घेतात . त्यामुळे अशा प्रकारावर कारवाई व्हायलाच हवी.
मुख्याध्यापकांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र देऊ नये—
फक्त नवोदय च्या प्रवेश परीक्षेसाठी पाचवीत प्रवेश घेतलेल्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी प्रवेश पत्र देऊ नये अशी मागणी भाजपा च्या वतीने करण्यात येत आहे . तसेच अशाप्रकारे प्रवेशपत्र दिले तर भाजपा च्या वतीने स्थानिक पालकांना घेऊन त्या हायस्कूल मध्ये जाऊन आंदोलन केले जाईल व त्याची पुर्ण जबाबदारी त्या हायस्कूल वर असेल , असा इशारा भाजपा च्या वतीने देण्यात येत आहे .
तात्कालिन शिक्षण सभापती डाॅ. अनिषा दळवी यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश शिक्षण समितीच्या शेवटच्या बैठकीत दिले होते . त्यांनी खात्याअंतर्गत चौकशी केली असता , संपुर्ण जिल्ह्यात १०४ विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते . जिल्हा परिषदेकडुन राबविण्यात आलेल्या मोहीमेत अनेक शाळांमधून परजिल्ह्यातील विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळून आले होते . याबाबत शाळा व मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सभापती डाॅ. अनिषा दळवी यांनी दिले होते .तसेच या परिस्थितीला संपुर्ण सिस्टीम जबाबदार असल्याचा घरचा आहेर शिक्षण विभागाला दिला होता .
शिक्षक संघटनानी आवाज उठवीणे गरजेचे
प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारया शिक्षक संघटनानी आपल्या जिल्ह्यातील मुलांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवीणे गरजेचे आहे .
३० एप्रिल ला होत असलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूल हे परीक्षा केंद्र आहे . भाजपा च्या वतीने स्थानिक पालकांना सोबत घेऊन परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेपासुन रोखले जाईल व त्याची पुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील , असा इशारा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने देण्यात येत आहे .

भाजपा वेंगुर्ले कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई . यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर – रसीका मठकर – वृंदा मोर्डेकर , परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपु परब , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व साई भोई , ता.चिटणीस समीर चिंदरकर , बुथप्रमुख शेखर काणेकर .

प्रतिक्रिया व्यक्त करा