तिरंदाजीसह अन्य खेळ शिकण्याची पर्वणी; तज्ञ शिक्षकांचे होणार मार्गदर्शन…
सावंतवाडी
येथील भोसले नॉलेज सिटीच्यावतीने सावंतवाडी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ‘समर स्पोर्ट्स कॅम्प” चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ४ ते १४ मे या कालावधीत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, चराठेच्या मैदानावर होणार आहे. दरम्यान यात क्रिकेट, बास्केटबॉल व तिरंदाजी या आऊटडोअर तसेच टेबल टेनिस, बॅडमिन्टन व स्केटिंग या इनडोअर गेम्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
९ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सकाळच्या सत्रात तर ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी सायंकाळच्या सत्रात प्रशिक्षण पार पडेल. या कॅम्पसाठी तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून यामध्ये बास्केटबॉलसाठी सुहास गुरव, तिरंदाजीसाठी जीवन ऐनापुरे, टेबल टेनिससाठी सुरीबाबू येरा, स्केटिंगसाठी आशिष भंडारी हे राष्ट्रीय प्रशिक्षक तर क्रिकेटसाठी दिनेश कुबडे व बॅडमिन्टनसाठी रवींद्र प्रभुदेसाई व उमेश नाटेकर हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहतील.
या कॅम्पसाठी नावनोंदणी २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत करायची असून नोंदणीसाठी ०२३६३- २७२२३५/२७२२५५/९४०४३९६१७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी ते भोसले नॉलेज सिटीपर्यंत मोफत बस सुविधा संस्थेतर्फे पुरविण्यात येईल.