You are currently viewing बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे काम करीत असताना कामगाराचा दुसर्‍या मजल्यावरून कोसळून मृत्यू

बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे काम करीत असताना कामगाराचा दुसर्‍या मजल्यावरून कोसळून मृत्यू

ओरोस येथे एका बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चे काम करीत असताना कसाल येथील मोहन महादेव कसालकर वय ६७ या कामगारांचा तीस फूट उंचीवरून खाली कोसळून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. याबात आरोस पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत देवरे अधिक तपास करीत आहेत.

ओरोस येथील महामार्गालगत एका बिल्डिंगचे काम सुरू आहे. या बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर चिरे बांधकाम करत असताना मोहन कसालकर हे खाली कोसळले. व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते खाली कोसळताच त्यांच्यासोबत काम करणार्‍या अन्य कामगारांनी खाली धाव घेतली उपचारासाठी दाखल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे सुना नातवंडे भाऊ असा मोठा परिवार आहे. प्रसाद येथील कसालकरवाडी मध्ये कुटुंबासह राहतात. व त्यांचा गवंडी कामगार म्हणून मोठा व्यवसायही होता. त्यांच्या निधनामुळे कसाल परिसरात शोककळा पसरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा