You are currently viewing जीव माझा तुझ्यात गुंतला

जीव माझा तुझ्यात गुंतला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*जीव माझा तुझ्यात गुंतला*

 

काॅलेज फेस्टिव्हलमध्ये मी,

पहिल्यांदा प्रेम गीत गायिले,

समोरच बसली होती तू ,

तेव्हाच माझ्या नजरेनं तुला पाहिले ||१||

 

काॅलेजला येता, जाता,

रोजच पाहत होतो तुला,

तुझ्यात जीव माझा गुंतला,

देशील होकार तू मला ||२||

 

पाऊस, ऊन, वारा लागू नये,

म्हणुन,छत्री धरायचो,

होकार तू देशील, म्हणून,

त्या नजरेने मी तुला पाहायचो ||३||

 

पदवी ची दोन वर्षे निघुन गेली,

तिसरं वर्षे आता सुरू झालंय,

होकार तू दिला आहेस प्रेमाचा,

सकाळी स्वप्नात मी पाहिलंय ||४||

 

क्षणोक्षणी तुझी आठवण येते,

तेव्हा,हाती घेतो मी, कुंचला,

चित्र तुझे काढण्या कागदावरी,

जीव माझा तुझ्यात गुंतला || ५||

 

युवा कवी प्रविण खोलंबे.

मो. ८३२९१६४९६१.

प्रतिक्रिया व्यक्त करा