दोडामार्ग:
महावितरण कंपनीच्या विरोधात सावंतवाडी उपकेंद्रात आंदोलना दरम्यान यंत्रचालक आंनद गावडे यांच्यासोबत बाचाबाचीची घटना घडली होती. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार विनायक गावस यांचे नाव एफआयआर मध्ये विनाकारण घालण्यात आले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना जर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सिंधुदुर्ग पोलीस टार्गेट करत असतील पत्रकारितेला हे बाधा पोहचवणारे आहे. या प्रकाराचा जाहीर निषेध दोडामार्ग तालुका पत्रकार संघाने केला असून त्याबाबतचे नियोजन दोडामार्ग तालुका पत्रकार संघाने विनायक गांवस यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्या गुन्हयातून पत्रकार विनायक गावस यांचे नाव वगळावे व त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली आहे.
याबबाबत दोडामार्ग पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घडलेल्या घटनेचे वृत्तांकन करणे हे पत्रकाराचे कर्तव्य असते, आणि हेच कर्तव्य बजावत असताना वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या विनायक गावस यांचे नाव फिर्यादीच्या फिर्यादिनुसार एफआयआर मध्ये घालण्यात आले. ते नाव वगळण्यात यावे. यापूर्वीच सावंतवाडी पत्रकार समिती व जिल्हा पत्रकार संघाने सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. शिवाय समाजातील विविध व्यक्ती व संघटना सुद्धा या प्रकारचा निषेध नोंदवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग पत्रकार संघाच्या वतीने आम्ही झाला प्रकार चुकीचा असून पत्रकार विनायक गावस यांचे नाव एफआयआर मधून वगळावे अशी मागणी करीत आहोत.
वार्तांकनासाठी गेलेल्या विनायक गांवस यांचे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीमध्ये जे नाव घातले गेले आहे, या विषयात आपण गांभिर्याने लक्ष घालून विनायक गांवस यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्या गुन्हयातून पत्रकार विनायक गावस यांचे नाव वगळावे व त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधले आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास देसाई, सचिव महेश लोंढे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप देसाई, यांसह तेजस देसाई, रत्नदीप गवस, साबाजी सावंत, गणपत डांगी, समीर ठाकुर, ओम देसाई उपस्थित होते.