व्हाइस चेअरमन पदी आत्माराम धर्णे यांची बिनविरोध निवड…
वेंगुर्ले
श्री.सोमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. आडेली या संस्थेच्या नूतन संचालक मंडळाच्या चेअरमन पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत संस्थेच्या नूतन चेअरमनपदी श्री. प्रकाश महादेव गडेकर यांची तर व्हाइस चेअरमन पदी श्री.आत्माराम रामचंद्र धर्णे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते साहेब, वेंगुर्ला माजी सभापती श्री. सुनील मोरजकर, आत्मा संस्थेचे अध्यक्ष श्री. देवा कांबळी, ओबीसी सेल तालुका प्रमुख श्री.नितीन मांजरेकर, सोसायटी माजी चेअरमन श्री.भाई गडेकर, सरपंच सौ. प्राजक्ता मुंडये, माजी सरपंच श्री.भारत धर्णे, ज्येष्ठ मानकरी श्री. नाना धर्णे, सर्व नवनिर्वाचित संचालक, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, निवडणूक अधिकारी श्री. एस एल कावले तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ यांनी उपस्थित होते.
दरम्यान निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर सोसायटी चे सर्व संचालक, शिवसेना पदाधिकारी, सोसायटी सभासद तसेच गावातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व ग्रामस्थ यांच्यावतीने चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देण्यात आल्या.