राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज दुखावला आहे. त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करत आहे. त्यामुळे हा वाद आणखी न वाढवता सत्ताधारी आमदार म्हणून जबाबदारी ओळखून अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवावा व वादावर पडदा टाकावा. अशी विनंती कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले राजकारणात, समाजकारणात सर्व समाजाचे लोक कार्यरत असतात. त्यामुळे जबाबदार लोकप्रतिनिधीने सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊन काम केले पाहिजे. जात, पात, धर्म असा भेदभाव न करता सर्वांचा आदर राखणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. एखाद्यावेळी अनावधानाने आपल्या मुखातुन काही वक्तव्ये निघतात. त्यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा कोणाचाही हेतू नसतो. मात्र ती वक्तव्ये चुकीची आहेत हे लक्षात आल्यानंतर चुक कबूल केली पाहिजे. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज दुखावला आहे. त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा वाद आणखी न वाढवता ब्राम्हण समाजाची माफी मागून वादावर पडदा टाकावा. तसेच सर्व समाजांमध्ये सलोखा निर्माण व्हावा, कोणत्याही समाजाबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरू नये याची काळजी घ्यावी, असा विनंती वजा सल्ला आ.वैभव नाईक यांनी आ.अमोल मिटकरी यांना दिला आहे.