You are currently viewing वसुंधरा सृष्टी चालते ईशसत्तेत

वसुंधरा सृष्टी चालते ईशसत्तेत

जागतिक साहित्य कला व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार श्री अरुण गांगल यांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

वसुंधरा सृष्टी चालते ईशसत्तेत
जीवन रुक्ष जीवनास आणी चैतन्य।।ध्रु।।

वसुंधरेला पर्जन्याची लागते ओढ
पर्जन्य बरसता दरवळतो मृदगंध
भिजताना सृष्टी होते प्रेमे सदगतीत।।1।।

निसर्गात प्रेम सदा असते अव्यक्त
एकमेकांची गरज घडवते जवळीक
झुरणे एकमेकांसाठी निसर्ग दत्त।।2।।

धरती देते किनारा सागराला प्रेमानं
हुरहूर जागते मनी भाव जागवून
वेणूचे सुर येता कानी राधा भारावत।।3।।

वृक्ष वेली आम्हा होत सोयरे वनचरे
झाडे लावूया वैभव सृष्टीचे जपुयारे
सांभाळू प्रेमे वसुंधरेचे पर्यावरण।।4।।

कृषीवल करती धरतीची मशागत
वसुंधरा देई चारा अन्न मिळे गोधन
ऋण साऱ्यांचे सांभाळू वसुंधरेचे नात।।5।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा