You are currently viewing लेक लाडाची

लेक लाडाची

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूर च्या सदस्या लेखिका कवयित्री वैशाली पडवळ यांची अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना

आई – बाबा होण्याची खुशी देई ती आजन्म…..
तुम्हा देण्या कन्यादानाच पुण्य घेई ती जन्म…..

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा…..
तिच्याकडेच असतो तुमच्या संस्कारांचा ठेवा…..

करू नका तिची आईच्या पोटात असताना हत्या…..
कमजोर नका बनवू इतकं की करेल आत्महत्या…..

तुम्ही रागावले असता तिच्यावर, होते ती गप्प…..
मनात राग असतानाही नेहमी बसते ती चुप्प…..

तिचा रुसवा काढताना होते तुमचीच फजिती…..
ती वाढवते पण सासर आणि माहेरची कीर्ती…..

देते आनंद जेव्हा पहिल्यांदाच बाबा बोलते …..
सासरी जाताना मात्र ती खुप रडवूनच जाते…..

नाकी -नऊ आणते कधी तिचा पुरवताना हट्ट…..
लाडात येऊन मग ती बिलगते कधी कधी घट्ट…..

मुलींनाच लागतात सोसावे परिस्थितीचे चटके…..
मनाला शांत करण्या मग सगळीकडे ती भटके…..

का जाव लागत नेहमी सांगा मुलीलाच सासरी…..
तिच्या नशिबी असते का हो गरमागरम भाकरी…..

किती करावे तितके कमीच मुलीचे हो गुणगान…..
मुलगी देई खुशी,आनंद,शांती आणि समाधान…..

मुलगी असे हो तुमच्या घराचा जीव की प्राण…..
प्रेम, जिव्हाळा ,आपलेपण याची असे खाण…..

मुलगी असे काळीज बापाच, सावली आईची…..
जाते करूनच परक एक दिवस लेक लाडाची…..

****************************
*©️®️*
*✍️…🧚🏻‍♀️ऐंजल वैशू*
*( वैशाली पडवळ)*

प्रतिक्रिया व्यक्त करा