कुडाळात २०० स्टाॅल असणार!
नर्सरी मासेपालन, संकरित बियाणे, अद्ययावत अवजारे असणार उपलब्ध!
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर!
सिंधुनगरी
जिल्ह्यातील शेतकरी पशुपालकांना आणि सुशिक्षित बेराजगारांना कृषी व पशुपालनाविषयी आधुनिक तंत्रज्ञान विकसित यंत्रसामुग्री यांचे ज्ञान मिळावे तसेच जिल्हयातील पशुपालक शेतक-यांना विविध प्रकारची आधुनिक कृषी अवजारे, हत्यारे, उपकरणे, बी-बियाणे, प्रगत कृषी तंत्रज्ञान, दुग्धव्यवसायातील आधुनिक यंत्रसामुग्री, विविध उपकरणे, पशु व पक्षांच्या विविध शुध्द देशी, संकरीत व सुधारीत जातींबाबत माहीती मिळावी, प्रत्यक्ष त्या-त्या जातीची जनावरे व कृषी औजारे, उपकरणे पहावयास मिळावी यासाठी ५ ते ८ मे या कालावधीत कुडाळ तहसिल कार्यालयानजिकच्या क्रिडा मैदानावर “सिंधु कृषी व पशुपक्षी प्रदर्शन”
आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा पशसंवर्धन अधिकारी डॉ दिलीप शिंपी, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते.
अल्प शेती असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीच्या शेती आणि शेती संलग्न विषयांचे प्रगत ज्ञान मिळाल्यास तसेच कृषि व पशुसंगोपनाविषयी नवनविन आधुनिक तंत्रज्ञान विकसित यंत्रसामुग्री याचे ज्ञान आणि जलव्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्व कळावे, याकरिता कृषि व पशुसंवर्धनाशी निगडीत आधुनिक यंत्र, उपकरणे व औजारे तसेच विविध जातीच्या पशु पक्षाचे चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करणे प्रस्तावित आहे. अशा कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांची व पशुपालकांची उत्पादन क्षमता वाढून त्याचा सामाजिक विकासावर प्रभाव पडतो. सध्या अति कष्ट करणारी पिढी दिसणे दुर्मिळ झालेली असल्याने सध्याच्या युवा वर्गाला कृषि व पशुसंवर्धन क्षेत्राची आवड निर्माण व्हावी, तसेच शेती व पशुसंवर्धन व्यवसायात नवनवीन आधुनिक, यांत्रिक व तांत्रिक पध्दतीचा अवलंब होऊन या क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हावा. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याकरीता कृषि व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात कृषि विषयक विविध उत्पादक कंपन्यांकडील साहित्य, हत्यारे उपकरणे तसेच यंत्र सामुग्री यांचे एकत्रित दालन प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला सबलीकरणाचे धोरणानुसार जिल्ह्यातील बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तुंच्या विक्रीसाठी दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात सहभागी होणा-या पशुपक्षांच्या विविध स्पर्धा (उदा. सुदृढ गाय स्पर्धा, सुदृढ म्हैस स्पर्धा, सुदृढ बैल स्पर्धा, सुदृढ खाँड स्पर्धा, सुदृढ कालवड स्पर्धा, सुदृढ पारडी स्पर्धा, सुदृढ शेळी स्पर्धा, सुदृढ मेंढी स्पर्धा, सुदृढ कुक्कूट स्पर्धा, दुग्ध स्पर्धा डॉग शो इत्यादी) आयोजित करण्यात येणार आहेत. सहभागी व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाकरीता रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविणेत येणार आहे. प्रदर्शनात सहभागी होणा-या पशु पक्षांकरीता प्रदर्शन स्थळापर्यंत येणे व स्वग्रामी परत जाणे, यासाठीचा वाहतुक खर्च, त्यांचे साठी प्रदर्शन कालावधीतील चार दिवसांसाठी चारा / वैरण. पशुखाद्य, पाणी आणि अत्यावश्यक औषधोपचार यासाठीचा खर्च, सदर जनावरांचे मालकांना प्रदर्शन कालावधीत पुरवावयाचे चहा, अल्पोपहार व भोजन इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
चार दिवसीय प्रदर्शनात उपस्थितांना शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दर्शविणा-या प्रबोधनपर कार्यक्रमांचे उदा. पथनाट्य, लोकनाट्य, पोवाडा, गीतगायन, छोटी नाट्यीका इत्यादी आयोजनाकरीता तसेच सहभागी होणा-या पशुपालकांचे संध्याकाळच्या वेळी मनोरंजनाकरीता विविध सांस्कृतिक कार्यक्रम संगीतमय कलाकृती, नाट्यकृती अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित असून कृषि आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ञ अनुभवी संसाधन व्यक्तींकडूनही चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रदर्शनात २०० स्टॉल उपलब्ध
कुडाळ येथे होणाऱ्या या सिंधू कृषी पशु पक्षी सिंधू सरस प्रदर्शन कार्यक्रमात विविध २०० स्टॉल उपलब्ध करण्यात येणार असून वाढत्या उष्णतेत पायबंद प्रयत्न करून कृषी विद्यापीठ १०,शासकीय दहा जी प ४० कोकण मेवा २० कृषी तंत्रज्ञान ४० बचत गट४० खाद्यपदार्थ २० अशा २०० स्टॉलचा समावेश आहे या स्टॉल नजीक कोंबडी म्हशी व पशुधन नाही उपलब्ध केले जाणार आहे तसेच पुणे येथील काहीपारंपरिक ऊर्जा स्त्रोत उपलब्ध करणारे स्टॉलही सहभागी होतील.
नवनवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन चर्चासत्र
सिंधू कृषी पशु पक्षी प्रदर्शन आणि सिंधू सरस या बचत गटांच्या उत्पादित मालावर आयोजित कार्यक्रमांमध्ये बांबू लागवड मत्स्यपालन शेळीपालन पशुधन तंत्राचे मार्गदर्शन ऊस काजू परिषद विविध उत्पादनावर मार्गदर्शन करणारी चर्चासत्रे आयोजित केली आहेत या प्रदर्शनातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पावसाळ्यात योग्य प्रकारे लागवड नवीन तंत्रज्ञानाची बियाणे उपलब्ध होण्यासाठी व मार्गदर्शक व फायदेशीर ठरणारे हे प्रदर्शन आहे