You are currently viewing राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

सन २०२१-२०२२ साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा दि. 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार होती. तथापि NCERT, नवी दिल्‍ली यांचे सूचनेनुसार काही प्रशासकीय कारणास्‍तव सदर परीक्षा पुढे ढकलण्‍यात आली आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्याथ्‍यांचे आवेदनपत्रे दि. १३ डिसेंबर २०२१ पर्यंत घेण्‍यात आले होते. तथापि सदर तारखेनंतर परीक्षेसाठी प्रविष्‍ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत परिषदेस मागणी करण्यात येत आहे.

            सदर परीक्षेपासून प्रज्ञावान विद्यार्थी वंचित राहू नये व विद्यार्थी हित विचारात घेता, सदर परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.ntsemsce.in   या संकेतस्थळावर भरण्यासाठी पुढीलप्रमाणे मुदत वाढ देण्यात येत आहे.

            ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे यापूर्वीची दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ ते १३ डिसेंबर २०२१ सुधारित दिनांक दि १९ एप्रिल २०२१ ते दि. २२ एप्रिल २०२२, शुल्क – १५०/-  शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रति संस्था प्रत्येक वर्षासाठी.  ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे सुधारित दिनांक  २३ एप्रिल २०२२ ते २६ एप्रिल २०२२  शुल्क-२७५/- सलग्नता शुल्क रु. २००/- प्रति संस्था प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी आहे.  ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे (शाळा / संस्था जबाबदार असेल तर – ऑनलाईन अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही.

            राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची दिनांक NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावरुन जाहिर करण्यात येईल. असे ए.पी. तावशीकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा