निदर्शकांनी पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्द्यांची उडवली खिल्ली
इचलकरंजी येथे वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात आज शुक्रवारी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील तीन पेट्रोल पंपावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्यांचा परामर्श देत खिल्ली उडवत महागाईचा निषेध करण्यात आला.यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून सातत्याने महागाईचा आगडोंब पसरत चालला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किलीचे बनले आहे. पेट्रोल-डिझेलने शंभरी तर गॅस सिलिंडरने हजारी पार केली आहे. त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण होत चालला असून हाच रोष केंद्र सरकारपर्यंत पोहचावा यासाठी आज शुक्रवारी इचलकरंजी येथे
शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी शहरातील एएससी कॉलेजसमोरील ग्राहक सोसायटी, इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट व राजवाडा चौकातील जाधव पेट्रोल पंप याठिकाणी इंधन
दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील काही मुद्यांचा परामर्श देत खिल्ली उडविण्यात आली. प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी, सध्या भोंगा आंदोलन छेडून राज्यात धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. महागाईमध्ये जनता होरपळत असून त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. वाढत्या महागाईमुळे जनता हैराण झाली असून त्यांच्या मनातील खदखद या आंदोलनातून व्यक्त केला जात आहे. ही दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या निदर्शनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष राहुल खंजिरे, उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, नंदकिशोर जोशी, भुषण शहा, राजू आवळे, प्रमोद पाटील, अजित मिणेकर, शशिकांत पाटील, प्रमोद मुसळे, प्रमोद खुडे, सतिश कांबळे, संग्राम घुले, दिलीप पाटील, ताहीर खलीफा, उदय गीते, शेखर पाटील, योगेश कांबळे, विजय मुसळे, समीर शिरगांवे, रवी वासुदेव, योगेश पंजवानी, ओंकार आवळकर, रविराज पाटील, राजु किणेकर, सतीश पवार, समीर जमादार, ताजुद्दीन खतीब, राज शेख, तोसिफ लाटकर, गोविंद आढाव, प्रशांत लोले, प्रविण पाटील, अशोक नांद्रे, शशील धुर्वे, सोहेल बाणदार, शौकत मुल्ला, चंद्रकांत मिस्त्री, रमेश धुमाळ, शहर महिलाध्यक्षा सौ. मीना बेडगे, बिस्मिल्ला गैबान, सावित्री हजारे, कल्पना तेवरे, रेश्मा सुतार, गीता रावळ, वैशाली बाबर, जरीना चौधरी, सुनिता चौगुले, खोतिजा जमादार, महानंदा हिरेमठ, शाहीन शेख, मुदस्सर कामत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.