You are currently viewing आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजना पोचवा – आमदार नीतेश राणे

आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजना पोचवा – आमदार नीतेश राणे

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे झाले उद्घाटन

कणकवली

आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार आहे.तर जन आरोग्य योजना जनतेचा आधार आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आम.नितेश राणे बोलत होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष सौ. संजना सावंत, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश खलिपे,वैद्यकीय अधिकारी संतोष चौगुले, नगरसेवक संजय कामतेकर,अण्णा कोदे,नगरसेविका प्रतीक्षा सावंत,मेघा गांगण,रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सी.एस.शिकलगार,डॉ. विद्याधर तायशेटे,संदीप मेस्त्री,प्राची कर्पे,साक्षी वाळके मनोहर परब,आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना यासह अन्य आरोग्य विषयक योजना आहेत. याची माहिती जनसामन्या पर्यंत पोहचवली पाहिजे. यातूनच या योजनांचा लाभ नागरिकां घेता येईल. या योजनांची जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गावोगावी जनजागृती केली पाहिजे.तसेच याचे बॅनर लावून हि प्रसिद्धी केली पाहिजे. या कामी आरोग्य यंत्रणेने स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदत घ्यावी. तसेच ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांचे आरोग्य सुदृढ व उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम केले पाहिजे, असे सांगतानाच केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे देऊन डिजिटल हेल्थ कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले. सूत्रसंचालन आरोग्य सेविका नयना मुसळे यांनी केले. आभार मनोहर परब यांनी मानले. दरम्यान, आरोग्य मेळाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत उपस्थितांना स्टॉल लावून मार्गदर्शन केले. याशिवाय राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची माहिती तसेच गर्भवती स्त्रियांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि कोणता आहार सेवन करावा याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली. याशिवाय मेळाव्यात आलेल्या शेकडो नागरिकांची डॉक्टरांनी विविध तपासणी करत आजारांवरची औषधे मोफत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा