You are currently viewing प्रेम चराचर

प्रेम चराचर

*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री पाटील यांचा अप्रतिम लेख*

🌺प्रेम चराचर🌺

आज कालच्या युगात कोणीही कोणावर प्रेम करत नाही.. प्रेम चराचरात व्यापलेले असले तरीही प्रेम हे एक नावाचं राहिले आहे..
प्राणी पक्षी यांच्यावर प्रेम करा ..माणूस म्हणून माणसावर प्रेम करा..कोणालाही आनंद द्यायला शिका..लोकांना मदत करायला शिका..
प्रेम दिल्याने प्रेम वाढते.. पण माणूस प्रेम पण देऊ शकत नाही.. प्रेमासाठी पैसा मोजावा लागत नाही..
प्रेम हा कोणालाही आनंद देऊ शकतो..ज्याला मदत पाहिजे त्याला मदत करा..यातही प्रेमाची आठवण आहे..प्रेमात लोभ नसावा..प्रेम पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही..
प्रेम मनाला आनंद देतो..दुसऱ्यांच्या मुखावर हसू देतो..त्याने जो आनंद मिळतो.. तो पैसा देऊनही मिळत नाही..
प्रेम भक्ती आहे साधना आहे..प्रेम हे सागर आहे..प्रेम हे अनंत आहे..प्रेम शिव प्रेम हे कृष्ण आहे..प्रेम चराचरात व्याप्त आहे..प्रेम प्रत्येक नात्यात हवे..
आई मुलीत आजी नातीत.. प्रेम फक्त स्वच्छ हवे..निर्मळ हवे..

✍️जयश्री पाटील.
हैद्राबाद ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा