*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरच्या संचालिका लेखिका कवयित्री रोहिणी अमोल पराडकर यांची अप्रतिम काव्यरचना*
**अष्टाक्षरी काव्यप्रकार*
*”सोने लुटू मांगल्याचे “*
भ्रष्टाचार रोखण्यास
सोने लुटू मांगल्याचे
करु मानव साखळी
देशप्रेम बंधुत्वाचे
मनातील अहंकारी
रोज रावण जाळावा
काम क्रोधाचे षड्रिपू
द्वेष भावही गळावा
जातीभेद सोडवून
मने जोडू विचारांची
अत्याचारी ठेचण्यास
एकजूट माणसांची
आपट्याच्या पानातून
दिसे हृदय आकार
स्वच्छ निर्मळ निकोप
मनी प्रेम अंगीकार
सौ.रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर 9767725552