राष्ट्रवादीच्या माध्यमातून ३२ जणांना रिक्षा परवाना
सिंधुदुर्ग जिल्हातील रिक्षा चालकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून न्याय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ३२ जणांना परत रिक्षा परमीट मिळवून दिले. जिल्हा रिक्षा संघटनेकडून अमित सामंत यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
या सत्काराच्यावेळी माहिती विषद करताना रिक्षा संघटना जिल्हा सेक्रेटरी सुधीर पराडकर यांनी सांगितले, की रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांची भेट घेऊन कोरोना कालावधीपासून रिक्षा व्यावसायिकांच्या रिक्षा परमिटचे नुतनीकरण थांबले होते. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांना रिक्षा व्यवसाय करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा केला आहे परंतु प्रश्न मार्गी लागत नाही.
अशा वेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे सहकार्य लाभले. तर हा परमीट नुतनीकरणाचा प्रश्न सुटेल म्हणून आम्ही रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.अमित सामंत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. अमित सामंत यांनी तातडीने याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून भेटीची वेळ घेतली. त्याप्रमाणे रिक्षा संघटना पदाधिकाऱ्याऺची जिल्हाधिकारी यांच्यासोबत भेट घडवून आणली आणि हा ब-याच कालावधी पासून अनिर्णित अवस्थेत असलेला परमिट नुतनीकरण प्रश्न सोडविला जाईल असा शब्द दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे हा प्रश्न सोडवून आम्हांला अमित सामंत यांनी न्याय दिला त्यासाठी आम्ही हे सहकार्य कधीही विसरू शकत नाही, असे आज अमित सामंत यांच्या सावंतवाडी येथे आयोजित सत्कार समारंभावेळी रिक्षा संघटना पदाधिकार्यांनी विचार व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना अमित सामंत यांनी सांगितले की, यापुढे ज्या ज्या वेळी रिक्षा चालकांना आपल्या व्यवसायात अडचणी निर्माण होतील. त्या त्या वेळी कुठलाही संकोच न बाळगता आपल्याशी संपर्क साधल्यास वाटेल ती मदत केली जाईल. तुमच्या ज्या ज्या समस्या असतील त्या आपल्याकडे घेऊन या निश्चित न्याय दिला जाईल. आपण केलेला सत्काचा क्षण माझ्या कायम स्मरणात राहील. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अर्चना घारे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, बाळ कनयाळकर, नझीर शेख, सर्वेश पावसकर, देवा टेमकर, बावतीस फर्नांडिस, याकूब शेख, कौस्तुभ राऊळ, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, उपाध्यक्ष महादेव बामणे, जयवंत टंगसाळी, मनोहर मसुरकर, आदेश नाईक, सदानंद धर्णे, राजन नवार, बाळा सुभेदार, बाळु वालावलकर, न्हानू राऊळ, यशवत वेटे, दत्तप्रसाद शेट्टर, नेपोलियन फर्नांडिस, अच्युत गावडे, पदाधिकारी सर्वस्वी सुधीर पराडकर यांचेसह अनेक रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.