श्रेयासाठी पुन्हा भूमिपुजन करणे योग्य नाही; प्रफुल्ल सुद्रीकांचा टोला…
कुडाळ
कळसुली-देदोनेवाडी प्रकल्पाला मिळालेल्या निधीवरून युवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ५६ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेने फुक्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी लगावला आहे. दरम्यान गेली पाच वर्षे राज्यात शिवसेना,भाजपची सत्ता होती. मग त्या काळात तुम्ही का निधी आणला नाही, आमच्या नेत्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले असताना पुन्हा भूमिपुजन करणे संयुक्तीक नाही, असे ही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात असे नमुद करण्यात आले आहे.