पुणे येथील उद्योजक नितीन बांदेकर करणार मार्गदर्शन
ओरोस
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स-सिंधुदुर्ग व कृषी विकास प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी उद्योगाच्या उत्तेजनार्थ कमीत कमी जागा व अधिक नफा असा नर्सरी व्यवसाय, तसेच स्वतःची वेबसाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात २३ ते २५ एप्रिल कालावधीत नर्सरी व्यवसायावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक नितीन बांदेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
२३ एप्रिल रोजी कणकवली तेली आळी येथील श्री भवानी सभागृह येथे दु. ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. २४ रोजी कुडाळ एमआयडीसी येथील एमआयडीसी गेस्ट हाऊस येथे दु. ३ वाजता तर सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे २५ रोजी दु. ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी , तरुण कृषी उद्योजक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने बाळासाहेब सावंत यांनी केले आहे.