पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी गेले होते नाशिक मध्ये…
कुडाळ
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले व उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्यासाठी नाशिक येथे गेलेले दिनकर जेमा पाडवी (मूळ रा.नंदुरबार) आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते. बुधवारी ते व त्यांची पत्नी मोटारसायकलने बाजारात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
दिनकर जेमा पाडवी पोलिस काॅस्टेबल बक्कल नंबर ५६६ हे कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते . ते दि. १५ एप्रिल २०२२ पासून त १९ एप्रिल २०२२ पर्यंत सलग सुट्टीवर गेले होते ही सुट्टी त्यांनी नाशिक येथे उपनिरीक्षक पदाची परीक्षा देण्याकरीता घेतली होती.परीक्षा देऊन ते आपल्या नंदुरबार येथील घरी गेले होते.बुधवारी रात्री ते आणि त्यांची पत्नी मोटारसायकलने जात असताना वाटेत अपघात होऊन ते जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.