जागतिक साहित्य कला व्यक्तिमत्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे यांची अप्रतिम काव्यरचना
महाराष्ट्राच्या मातीत पेरिलं समतेचं रं बीज,
ज्योत ज्ञानाची लाविली त्यानं मनामनात आज,
दीन दुबळ्यांचे अश्रू, पुसण्या नव्हतं इथं कुणी,
जन्म घेतला ज्योतिबानं या क्रांती वणव्यामधी ||१||
दीन, दुबळ्यांवरी अन्याय पाहुनी,
दुःख झाले या ज्योतिबाच्या मनी,
चाले वाट युग परिवर्तन क्रांतीची,
केला विचार मनात त्या क्षणी ||२||
वर्षानुवर्षे समाज राहिला विद्याविना ,
ज्ञान देण्याचा विचार केला मनात,
शाळा काढली मुलींची पहिली,
भिडे वाड्यात, पुणे शहरात || ३||
बाल विवाह, केशवपन, विधवा सतीची कथा,
त्रास भोगूनी ज्योतिबानं सारा,
परंपरेच्या रुढीची मोडली हो प्रथा,
केला वाहता रं समतेचा वारा ||४||
गुलामीचं होतं जीणं, साऱ्या मानवाचं,
कष्टकरी, शेतकऱ्यांच्या ,नव्हता मुखी घास,
ज्योतिबाची लेखनी लिहीते , मानवतेच्या व्यथा,
तोडुनी गुलामीचा फास ||५||
ब्राम्हणाचा मोडुनी कसब,सांगी मानवतेला सत् धर्म,
व्यथा सांगुनी समाजाच्या,लिहिली गुलामगिरी,
ज्योत क्रांतीची, विचार समतेचा,
मारिला आसूड शेतकऱ्याचा धर्मव्यवस्थेवरी ||६||
झिजले आयुष्य तुझे ज्योतिबा,
करण्या अन्यायाचा खात्मा,
सत्यशोधक ज्योतिबा तुम्हीच,
आहात आमचे खरे महात्मा ||७||
*युवा कवी प्रविण खोलंबे.*
*मो. ८३२९१६४९६१*