*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ. जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची अप्रतिम गौळण*
राधे हरवली नथणी
राधे तुझी हरवली ग नथणी ।। धृ ।।
गोपगोपिका जमल्या साऱ्या
काखेत घडा रस्ता यमुनेचा
पाणी भरता सहज वाकता
शीळ मारली कुणी
कुठे तुझी नथणी
राधे तुझी हरवली नथणी ।। 1 ।।
कालिंदी च्या कदंब तरुवरी
गुंजे स्वर तो मधुर बासुरी
तल्लीन होता गोपगोपिका
कशी भुलले ग मनी
राधे तुझी हरवली नथनी ।। 2 ।।
आज अचानक कान्हा आला
मधुरम काही गोड बोलला
बोल ऐकता धन्य जाहली
तृप्त राधा अंतः करणी ।। 3 ।।
राधे
हरवली नथणी राधे
तुझी हरवली नथणी ।। 3 ।।
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट 14 एप्रिल 2022