You are currently viewing धर्म व कर्मकांड यांचा परस्पर संबंध काय ?

धर्म व कर्मकांड यांचा परस्पर संबंध काय ?

क्रमशः..*

या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडणे आवश्यक वाटते. मानवी जीवनात परमेश्वर कुठल्याही प्रकारे व कुठल्याही कारणास्तव ढवळाढवळ करत नाही आणि तो कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर असे ध्यानात येईल की, लोक जे कर्मकांड करतात त्याचा ते समजतात तसा परमेश्वराची काहीही संबंध नसतो. अनंत कोटी ब्रम्हांड परमेश्वराकडून निर्माण होतात, स्थितीला राहतात, लयाला जातात व पुन्हा उदयाला येतात. या अनंत कोटी ब्रह्मांडात आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाला बिंदू इतकेही स्थान नाही. अशा परिस्थितीत माणूस आणि त्याच्याकडून घडणारे कर्मकांड यांना परमेश्वराच्या प्रचंड साम्राज्यात काही काम नाही हे ओघानेच आले. परमेश्वराच्या या प्रचंड साम्राज्यात महत्त्व आहे ते निसर्गनियमांना. ( क्रमशः..)

 

*– सद्गुरू श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा