जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…गझल प्राविण्य…गझल मंथन सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची अंगारकी संकष्टीचे औचित्य साधून लिहिलेली अभंग रचना
गणेश दर्शन । चला आता करू ।
भक्ती मनी धरू । गणेशाची ।। १ ।।
महाराष्ट्र ख्याती । अष्टविनायक ।
सिद्धिविनायक । सिद्धटेकी ।। २ ।।
मोरगांवी पहा । तो श्री मोरेश्वर ।
हा मयुरेश्वर । पहिल्यांदा ।। ३ ।।
चिंतेला हरण । करी चिंतामणी ।
वंदितो चरणी। थेऊरला ।।४।।
महागणपती । रांजणगावात ।
भक्ता हृदयात । वास करी ।।५।।
ओझरला पहा । तो श्री विघ्नेश्वर ।
श्री बल्लाळेश्वर । भव्य घंटा ।।६ ।।
लेण्यात वसला । श्री गिरीजात्मक ।
इच्छा दायक । विनायक ।।७।।
शोभा वागळे
मुंबई.