You are currently viewing सामाजिक अंतर्मनाची उभारणी..

सामाजिक अंतर्मनाची उभारणी..

 

*सुख-शांतीच्या दिशेने जगाची वाटचाल घडवून आणण्याचा उपाय एकच व तो म्हणजे सामूहिक अंतर्मनाची ठेवण (Pattern of collective Sub-conscious mind) बदलणे हा होय.*

 

🟠 *त्यासाठी “खरा देव कशाला म्हणतात?*

 

🟠 *खरा धर्म कशाला म्हणतात?*

 

🟠 *निसर्गाचे त्रिकालाबाधित सिद्धांत काय आहेत? (Universal laws of nature) व ते प्रत्येकाच्या जीवनात,मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी,कसे कार्यरत असतात? ते त्रिकालाबाधित सिद्धांत प्रत्येकाच्या जीवनात काय व कसे परिणाम घडवून आणतात? या त्रिकालाबाधित सिद्धांताशी खऱ्या धर्माचा कसा संबंध आहे,*

 

🟠 *इतर धर्माच्या लोकांचा तिरस्कार,द्वेष,मत्सर,छळ केल्याने व त्यांना दु:ख देण्याने ते सर्व पाप बुमरँग होऊन परत आपल्याकडेच कसे येते? व आपल्या नाशाला कारणीभूत ठरते?” यासंबंधीचे सखोल ज्ञान सर्व धर्मांच्या पोराबाळांना अगदी लहानपणापासून सुलभ गोष्टींच्या रूपाने सतत देत राहणे आवश्यक आहे.परंतु हे सर्व घडवून आणण्यासाठी सर्व धर्मांच्या तथाकथित धर्मोपदेशकांनाच प्रथम हे सखोल ज्ञान शिकवावे लागेल तर ते पोरांपासून थोरांपर्यंत पोहोचून जगाचे कल्याण होईल.असे कधी घडेल तेव्हा घडो पण ही काळाची गरज आहे हे मात्र निश्चित.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा