You are currently viewing रेशिमगाठी

रेशिमगाठी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कवयित्री लेखिका प्रा. सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

रेशिमगाठी वर बांधतो,जाणकार म्हणतात
काही गाठी आपण बांधा आहे पहा हातात
नशिबाने जर छान मिळाला जोडीदार गोड
आपसुक सुटतं जीवनाचं सुंदरसं कोडं …

नशिबवान पण कुठले सारे
दुर्दैवाचे फिरती वारे
असार होते जीवन सारे
हात मारूनी पहा कपाळी ..नशिब फुटे म्हणतात …
काही गाठी आपण बांधा …
आहे पहा हातात …

हाती नाही काही आपुल्या
नाड्या बांधून नाचती बाहुल्या
पडती त्यांच्या मोठ्या सावल्या
पहा माणसे फार उशिरा उशिराच कळतात…
काही गाठी आपण बांधा ..
आहे पहा हातात ….

जोडून ठेवा रेशिम धागे
रहात नाही काही मागे
नाव ही नाही गाव ही नाही
पश्चातापाच्या आगीत माणसे पहा जळतात..
काही गाठी आपण बांधा …
आहे पहा हातात ….

जीवन आहे खूपच सुंदर
बनवू त्याला आपण मंदिर
मूर्ती स्थापू नातलगांच्या
प्रेमादराने वळवताच माणसे पहा वळतात
काही गाठी आपण बांधा
आहे पहा हातात …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १५ मार्च २०२२
वेळ संध्या: ५ : १९ रासेगांव

प्रतिक्रिया व्यक्त करा