बालपण असतं निरागस बागेतील,
रंगीबेरंगी फुलाचा गंध घेणारं फुलपाखरू,
बालपण असतं कोवळं,
नाजूक, साजूक ते रुपडं,
निरागसता नयन बोलके,
शब्दांचे बोल ते बोबडं ,
बालपण असतं आनंद,
वाटे नवल लुटुपुटुचं ते चालणं,
दुडुदुडु धावणं बोबडं ते बोलणं,
बालपण असतं तोंडात बोट घालून,
आरशात पाहून ते हसणं अन्,
तोंडावर हात ठेवून गप्प बसणं,
बालपण असतं खुपचं आनंदी,
नाजुक हातांचा कोमल स्पर्श,
क्षणक्षणाचा तो भाव हर्ष,
बालपण असतं गंमती, जमती,
घास भरवि,चिऊ काऊचा,
प्रेमळ आई तिच्या मायेचा,
बालपण असतं प्रेमळ मनाचा,
निर्मळ , निरागस भाव,
हाक मारी आई दुडुदुडु तू धाव,
कवी प्रविण खोलंबे.
मो.८३२९१६४९६१