You are currently viewing वेंगुर्ले येथे दहा हजार जोर व दहा हजार बैठकांचा संकल्प हनुमान चरणी अर्पण..

वेंगुर्ले येथे दहा हजार जोर व दहा हजार बैठकांचा संकल्प हनुमान चरणी अर्पण..

हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोंनसुरकर व्यायाम शाळेचा उपक्रम

वेंगुर्ले

आजची तरुण पिढी व्यसनाधीतेकडे वळत असतानाच व्यायाम हीच यशस्वी आरोग्याची गुरुकिल्ली असा संदेश देत आज हनुमान जन्मोत्सव दिनी वेंगुर्ला गाडीअड्डा येथील उंच हनुमान टेकडीवर असलेल्या श्री.हनुमान मंदीरा समोर येथील सोंनसुरकर व्यायाम शाळेच्या शरीरसौष्ठवपटूनी दहा हजार जोर व दहा हजार बैठका मारून संकल्प पूर्ण करीत अभिषेक चढविला.

तसेच ह्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून समाजाला आरोग्याच्या यशाचा वेगळा संदेश दिला आहे. गेली दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने व्यायाम शाळा यावर निर्बंध होते. मात्र कोरोना चा काळ संपला असल्याने व्यायाम शाळा पूर्ववत सुरू झाले आहेत. वेंगुर्ले येथील सोंनसुरकर व्यायाम शाळा गेले 24 वर्ष व्यायामाचे प्रसाराचे काम करत असून दर वर्षी हनुमान जयंतीला तरुण शरीर सौष्ठव पटू हनुमान मंदिरासमोर व विविध व्यायाम शाळातून जोर व बैठका एकाच वेळी पहाटे मारतात. यावर्षी दहा हजार जोर व दहा हजार बैठकांचा संकल्प केला होता.

त्यानुसार आज वेंगुर्ला येथील उंच हनुमान टेकडीवर असलेल्या हनुमान मंदीरा समोर दहा हजार जोर व बैठकांचा संकल्प पहाटे पाच वाजल्यापासून सुरू करत दुपारी 11 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने जोर-बैठका पूर्ण केल्या. महाराष्ट्र श्री विजेते किशोर सोंनसुरकर यांच्या संकल्पनेतून या जोर आणि बैठकांचा संकल्प या वर्षी पूर्ण करीत तरुणांनी व्यसनाधीन न होता व्यायामाकडे वळावे असा संदेश दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा