You are currently viewing जय हनुमान

जय हनुमान

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांनी हनुमान जयंती निमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

जय हनुमान प्रेमळ दाता
सकल जनांचा तुच त्राता
राम लखन जानकी माता
भक्ती गुण तुच सच गाता

मन प्रेमळ भक्त तुच साचा
सूर्य तेज तुच झेप रे घेता
क्षण तन ह्दयी बस जाता
तुच तारक प्रसंन्न हो आता

मम अंतरी दुःख भर जाता
लोचनी आसू झर कर आता
तुज चरण अश्रू जल रे धोता
कर पावन मनतन जीव आता

तुच संजीवन जीवन मज देता
ह्दयी तुझ्या राम जानकी माता
राम नाम फत्तर तर जल तरता
कनक लंका तुच नाश कर देता

शक्ती बुध्दी तुच असे हनुमंता
पाप ताप दर्द नाश कर आता
तुच अर्पितो अश्रूजल अक्षता
रुई पर्ण गळा नमीतो मी माथा

पंचमुखी हनुमान दर्शन दे आता
माझा खरा तुच आहेस रे त्राता
फुल भक्ती प्रेम संजीवन रे होता
दुःखपाश श्रंखला तोड रे स्वतः

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा