सावंतवाडी
राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती विश्र्वभूषण बोधिस्तव डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी करत सहभागी झाले होते.
यावेळी विविध समाजातील मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ध्वजारोहण, त्रिसरण पंचशील, बुद्ध पूजापाठ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्यांना प्रमुख पाहुणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक घराघरात पोचविण्यासाठी प्रत्येकानी कार्य केले पाहिजे. त्यांनी दिलेला शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा आपण आपल्या आयुष्यात आचरण केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. यावेळी बुद्ध भीम गीतांचा सुरेल असा नजराणा सादर करण्यात आला. तसेच सायंकाळी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत या विषयांवरील व्याख्यानातून डॉ. उल्हास त्रीरत्ने यांनी सुंदर असे विचार उपस्थितांसमोर मांडले. त्यानंतर सायंकाळी संपूर्ण सावंतवाडीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करत रॅली काढण्यात आली.